Education loan Scheme Maharashtra :- नमस्कार मित्रांनो, आज या लेखात आपण केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या शैक्षणिक कर्ज योजना या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत.
महाराष्ट्र राज्यात बहुतांश विद्यार्थीं हे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतात परंतु कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्या कारणामुळे त्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करता येत नाही त्यामुळे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात ज्यामुळे त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यास अडथळा निर्माण होतो. 'Education loan Scheme Maharashtra In Marathi'
पालक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बँक, वित्त संस्था यांच्याजवळ शिक्षण कर्जासाठी अर्ज करतात परंतु बँक, वित्त संस्था यांच्या जाचक अटी तसेच कुटुंबाकडे कमाईचे कुठल्याच प्रकारचे स्थायी साधन नसल्या कारणामुळे त्यांना कर्ज दिले जात नाही.
![]() |
| Education loan Scheme Maharashtra In Marathi |
कर्ज न दिल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतो या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे राज्यातील उच्च शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक कर्ज योजनेची सुरुवात केली आहे.
विद्यार्थी या योजनेच्या सहाय्याने स्वतःचे उच्च शिक्षण पूर्ण करून स्वतःचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करू शकतील व त्यामुळे राज्याचा देखील विकास होईल.
शैक्षणिक कर्ज योजना या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे जेणेकरून विद्यार्थी कुठल्याही आर्थिक अडचणी शिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
शैक्षणिक कर्ज योजना या योजनेअंतर्गत "Education loan Scheme Maharashtra In Marathi" राज्यातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील व्यक्तींना लाभ दिला जाईल.
योजनेचा उद्देश्य :-
अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.
योजनेची वैशिष्ट :-
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीमधल्या चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वपूर्ण अशी एक योजना आहे.
शैक्षणिक विभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थी या योजनेअंतर्गत स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
शैक्षणिक कर्ज योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना अर्ज करताना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
योजनेच्या प्रमुख अटी :-
अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांपर्यत असावे.
अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.98000/- व शहरी भागासाठी रु.120000/- पर्यंत असावे. 'Education loan Scheme Maharashtra In Marathi'
राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.100000/- पर्यंत असावे.
जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
दिल्या जाण्याऱ्या लाभाचे स्वरूप :-
एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या कर्ज योजने अंतर्गत सन 2009 या वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे.
सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे.
सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज मर्यादर देशात शिक्षणसाठी रु.10 लाख व परदेशासाठी रु.20 लाख इतकी आहे.
सदर कर्जावर 4 टक्के व्याजदर आकारण्यात येतो.
अर्ज करण्याची पध्दत :-
ऑफलाईन :
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.
अर्जदाराने अर्जासोबत वर नमूद केलेल्या पात्रतेंच्या अटींच्या पृष्ठयर्थ संबधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडण्यात यावी.
मनुद केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांकडून अशा प्रमाणपत्राच्या व कागदपत्रांच्या दोन प्रती अर्जदाराने मिळवाव्या.
संपर्क कार्यालयाचे नांव :-
अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना |
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना |
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना |
Education loan Scheme Highlight :-
अ.क्र. |
योजना |
सविस्तर माहिती |
|
1 |
योजनेचे नांव |
शैक्षणिक कर्ज योजना |
|
2 |
योजनेचा प्रकार |
केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व
विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी
दिल्ली यांच्या योजना |
|
3 |
योजनेचा उद्देश |
अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची
इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात
त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व
सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात. |
|
4 |
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव |
अनुसूचित जातीतील चर्मकार समाज. |
|
5 |
योजनेच्या प्रमुख अटी |
अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांपर्यत असावे. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.98000/- व शहरी भागासाठी रु.120000/- पर्यंत असावे राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.100000/- पर्यंत असावे. जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा. महामंडळाने वेळोवेळी घालून
दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील. |
|
6 |
दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप |
एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या कर्ज योजने अंतर्गत सन २००९ या वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज मर्यादर देशात शिक्षणसाठी रु.10 लाख व परदेशासाठी रु.20 लाख इतकी आहे. या
कर्जावर ४ टक्के व्याजदर आकारण्यात येतो. |
|
7 |
अर्ज करण्याची पध्दत |
अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल. अर्जदाराने विहित नमुन्यातील
अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे. |
|
8 |
योजनेची वर्गवारी |
शैक्षणिक |
|
9 |
संपर्क कार्यालयाचे नांव |
सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे. |
तर मित्रांनो, आजची ही शैक्षणिक कर्ज योजना या योजनेसंबंधीची अपडेट तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटच्या इतर पोस्ट सुद्धा नक्की पहा.
धन्यवाद..!!
.png)
0 Comments
नमस्कार मित्रांनो....!
सदर वेबसाईट ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित वेबसाईट नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली Comment मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकार्यांना भेट देण्यास विनंती करतो.
धन्यवाद........!