संजय गांधी निराधार अनुदान योजना | Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Maharashtra in Marathi

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Maharashtra :- नमस्कार मित्रांनो, आज या लेखात आपण  संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. 

संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची योजना आहे. 

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Maharashtra
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Maharashtra

संजय गांधी निराधार अनुदान या योजनेत, पात्र कुटुंबात फक्त एकच लाभार्थी असल्यास 600 रुपये प्रती महिना आणि एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास 900 रुपये दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. 'Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Maharashtra'

योजनेचा उद्देश :-

राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन मिळावे हा या योजनेमागचा उद्देश आहे.

राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

राज्यातील निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारावे.

राज्यातील निराधार व्यक्ती सशक्त तसेच आत्मनिर्भर व्हावेत.

राज्यातील निराधार व्यक्तींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा.

राज्यातील निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. 

आंतरजातीय विवाह अनुदान योजना |

योजनेच्या प्रमुख अटी व पात्रता :-

अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.

अर्जदाराचे नाव दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत असले पाहिजे.

संजय गांधी निराधार अनुदान या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला.

अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला.

 निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ).

घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला.

अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला.

तृतीयपंथी.

देवदासी.

35 वर्षावरील अविवाहीत स्त्री.

तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी.

सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. 

या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. "Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Maharashtra"

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-


विहीत नमुन्यातील अर्ज.

वयाचा दाखला - किमान 18 ते 65 वर्ष (18 पेक्षा कमी वय पालकांमार्फत लाभ).

किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी. (Maharashtra Domicile Certificate) 


विधवा महिला अर्जदाराकरीता पतीचा मृत्यू दाखला.

दिव्यांग - जिल्हा शल्यचिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक (किमान 40 टक्के).

अनाथ दाखला

दुर्धर आजार प्रमाणपत्र

उत्पन्नाचा दाखला

दिव्यांग - कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 50,000/-

आधार कार्ड रेशनकार्ड

निवडणूक ओळखपत्र

बँक पासबुक झेरॉक्स

रहिवासी दाखला

अर्जदाराचा फोटो इत्यादी.

संजय गांधी निराधार योजनेचे लाभ :-

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थीस दरमहा 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.

एकापेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या कुटुंबाला दरमहा 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.

निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

राज्यातील निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारेल.

राज्यातील निराधार व्यक्तींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

राज्यातील निराधार व्यक्ती या योजनेअंतर्गत सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

अर्ज करण्याची पद्धत :-

ऑफलाईन :

अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.

अर्जदाराने अर्जासोबत वर नमूद केलेल्या पात्रतेंच्या अटींच्या पृष्ठयर्थ संबधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडण्यात यावी. 'Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Maharashtra'

मनुद केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांकडून अशा प्रमाणपत्राच्या व कागदपत्रांच्या दोन प्रती अर्जदाराने मिळवाव्या. 

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना (सुधारीत) |

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Highlights :-

.क्र

योजना

सविस्त


1


योजनेचे नाव


संजय गांधी निराधार अनुदान योजना



2


योजनेचा प्रकार


राज्य पुरस्कृत योजना



3


योजनेचा उददेश


राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन


4

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव

सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.


5


योजनेच्या प्रमुख अटी


या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.



6


दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप


या योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 600/- प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये 900/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.



7


अर्ज करण्याची पध्दत


अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो



8


योजनेची वर्गवारी


आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन



9


संपर्क कार्यालयाचे नाव


जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय


इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना |

तर मित्रांनो, आजची ही संजय गांधी निराधार अनुदान योजना  या योजनेसंबंधीची अपडेट तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटच्या इतर पोस्ट सुद्धा नक्की पहा.

धन्यवाद..!!

Post a Comment

0 Comments