भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना | Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Maharashtra In Marathi

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Maharashtra :- नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण महाराष्ट्र शासनाच्या स्वाधार योजनेबद्दल आज जाणून घेणार आहोत तसेच ही स्वाधार योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना म्हणून सुद्धा ओळखली जाते. 

सदर लेखातून आपण योजने बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जसे की या योजनेचे उद्दिष्टे, फायदे, योजना मिळवण्याची कार्यपद्धत, तसेच योजनेच्या अटी यासारख्या अनेक घटकांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ मध्ये सुरू केलेली एक शैक्षणिक योजना आहे. 

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Maharashtra In Marathi
Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Maharashtra In Marathi 

इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. 'Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Maharashtra'

स्वाधार योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. 

स्वाधार योजनेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. 

सन २०१८-१९ पर्यंत ३५,३३६ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठी ११७.४२ कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आलेली आहे.

स्वाधार योजने बद्दल थोडक्यात :-

राज्यातील विद्यार्थी इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतो परंतु काही ठिकाणी विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणी इयत्ता 10वी नंतर च्या शिक्षणाची सोय उपलब्ध नसते त्यामुळे विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यावर पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घरापासून दूर दुसऱ्या शहरात जावे लागते व त्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या शहरात वास्तव्य करावे लागते.

परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या व अपुरी शासकीय वसतिगृहे यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात राहण्याची सोय उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी जास्त पैसे देऊन स्वतःच्या राहण्याची सोय करावी लागते. "Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Maharashtra"

परंतु राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात व कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी स्वतःच्या राहण्याची सोय करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात जे त्यांना अशक्य असते या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो व विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतो. 

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून इयत्ता 11वी व त्या पुढील शिक्षण तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो.

राज्यात शिकणाऱ्या इयत्ता 11वी, इयत्ता 12वी व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या तसेच शासकीय वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नवबौद्ध विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे स्वाधार योजनेचा मुख्य उद्देश आहे. 'Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Maharashtra'

स्वाधार योजनेअंतर्गत स्वतःच्या घरापासून दूर दुसऱ्या शहरात शिक्षण पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून विद्यार्थी कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व राज्याचा विकास करू शकतील.

राज्यातील जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याकारणामुळे स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यांच्यासाठी स्वाधार योजना एक फायद्याची ठरणार आहे कारण या योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतील.

स्वाधार योजनेचा उद्देश :- 

राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील इयत्ता 11वी, इयत्ता 12वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून देणे हा स्वाधार योजनेचा मुख्य उद्देश आहे.

दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारणे.

विद्यार्थ्यांचे सामाजिक व आर्थिक विकास करणे.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल बनविणे.

विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.

दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना |

स्वाधार योजनेची वैशिष्ट्य :-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थीं घरी बसून आपल्या मोबाईलच्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचा पैसा आणि वेळ दोघांची बचत होईल.

या योजनेअंतर्गत देण्यात येणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.

शैक्षणिक कर्ज योजना |

स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठल्याच आर्थिक तंगी चा सामना करावा लागू नये या उद्देशाने सुरु करण्यात आलेली बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना खूप महत्वाची योजना आहे.


अ.क्र.


खर्चाची बाब


मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर याठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी



महसूल विभागीय शहर व “क” वर्ग मनपा शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी


उर्वरित शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी



1



भोजन भत्ता



32000/-



28000/-



25000/-



2



निवास भत्ता



20000/-



15000/-



6000/-



3



निर्वाह भत्ता



8000/-



8000/-



6000/-



एकूण



60000/-



51000/-



43000/-



टिप:- वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रु.5000/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु.2000/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.



इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना |

स्वाधार योजनेसाठी पात्रता :- 

सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी विध्यार्थी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या प्रवर्गाचा असावा.

विद्यार्थ्यांने जातीच दाखला सादर करणे बंधनकारक राहील.

विध्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. 

विद्यार्थ्यांने स्वतःचा आधार क्रमांक त्याने त्याच्या राष्ट्रीयकृत/ शेड्यूल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे  बंधनकारक असेल.

विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 250000 /- (अडीच लाख रुपये) पेक्षा जास्त नसावे .

विद्यार्थी स्थानिक नसावा.

विद्यार्थी इ. 11 वी, 12 वी आणि त्यानंतरचे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा. 

इ. 11 वी आणि 12 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इ. 10 वी मध्ये किमान 60 % गुण असणे अनिवार्य असेल. 

इ. 12 वी नंतरच्या दोन वर्षाकरिता जास्त कालावधी असलेल्या पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इ. 12 वी मध्ये 60 % पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य असेल. 

दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60 % गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/ CGPA चे गुण असणे आवश्यक राहील.

इ.12 वी नांतर पदवीका, पदवी अभ्यास क्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा आणि

पदवीनांतर पदव्युत्तर पदवी / पदवीका अभ्यासक्रमाचा कालवधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा.

विद्यार्थ्याने राज्य शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद /वैद्यकीय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र
तंत्रशिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधीकारी याांच्या मार्फत मान्यता प्राप्त महाविध्यालयामध्ये व
मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.

विद्यार्थांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. निवडलेला  विद्यार्थां संबंधीत अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.

स्वाधार योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण असेल, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची
किमान टक्केवारीची मर्यादा 50% इतकी राहील.

प्रवेशित विद्यार्थ्यास प्रत्येक सत्र परीक्षेचा निकालाची  प्रत निकाल लागल्यापासून 15 दिवसांचे आत
नेमून दिलेल्या कार्यालयात  सादर करणे बांधनकारक राहील.

सदर योजनेचा लाभ प्रवेशित अभ्यासक्रमांच्या कालावधी पर्यंतच  देय राहील. या योजनेचा लाभ
विद्यार्थ्यांना एकुण शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत घेता येईल.

विद्यार्थ्यांने खोटी माहिती व कागदपत्रे देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा 
शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण  न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करित असल्यास आणि इतर
मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील.
तसेच त्यास दिलेल्या रकमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल.

स्वाधार योजनेचा लाभ मांजूर झाल्यानांतर विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी  किमान  ६० टक्के गुण मिळविणे  अनिवार्य आहे अन्यथा तोया योजनेस अपात्र होईल.

संजय गांधी निराधार अनुदान योजना |

स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-

लाभार्थी विद्यार्थ्याचे जातप्रमाणपत्र.

महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून रहिवासी दाखला.

लाभार्थी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड.

लाभार्थीचे बँक खाते.

विद्यार्थी अपंग असल्यास त्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र.

विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असेल तर दहावी ची गुणपत्रिका.

शिकत असलेल्या महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.

स्वाधार योजना अंतर्गत लाभाचे वितरण :- 

विद्यार्थ्यांचा प्रवेश ज्या वसतिगृहाशी संलग्न करण्यात आला आहे त्या वसतिगृहाचे गृहप्रमुख / गृहपाल विद्यार्थ्यांने घेतलेल्या प्रवेशाच्या ठिकाणी म्हणजे संबंधीत महाविद्यालयाकडुन उपस्थितीचा अहवाल प्राप्त करुन संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना सादर करतील व संबंधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सदर योजनेतील पात्र प्रत्येक तिमाही उपस्थितीच्या आधारे अनुज्ञेय रक्कम त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT Portal मार्फत जमा करतील. 

विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी त्यांचा आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यात येईल.

DBT Portal सुरु होईपर्यत प्रचलित पध्दतीने सदरचा लाभ विद्यार्थ्यांच्या नांवे RTGS पध्दतीने त्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.

विद्यार्थ्यांने संबधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेंतर्गत अनुज्ञेय होणाऱ्या रक्कमेपैकी पहिल्या तिमाहीची रक्कम आगाऊ देण्यात येईल.

स्वाधार योजनेंतर्गत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्याची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अदा करण्यात येईल.

जे विद्यार्थी व्यवसायिक पाठयक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता या योजनेचा लाभ घेत असतील त्यांना या योजनेतील निर्वाह भत्याचा लाभ मिळणार नाही.

विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५% असणे आवश्यक राहील, याबाबत संबंधित संस्थेच्या प्राचार्यांकडून प्रत्येक तिमाही उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. 

अर्ज करण्याची पद्धत :- 

स्वाधार योजनेसाठी अर्जदाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. 

ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जावे लागेल.

समाज कल्याण कार्यालयात जाऊन स्वाधार योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरावी लागेल.

अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज कार्यालय जमा करावा लागेल.

अशा प्रकारे तुमची स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

स्वाधार योजनेचा अर्ज डाऊनलोड करा :- HEAR

स्वाधार योजनेचा GR डाऊनलोड करा :- HEAR

तर मित्रांनो, आजची ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेसंबंधीची अपडेट तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटच्या इतर पोस्ट सुद्धा नक्की पहा.

धन्यवाद..!

Post a Comment

0 Comments