Maharashtra Inter-Caste Marriage Scheme 2024 :- नमस्कार मित्रांनो, आपल्या देशात अजूनही जात, धर्म यावरून भेदभाव केला जातो आणि जात, धर्माच्या नावाखाली दंगे देखील घडवले जातात. ही अस्पृश्यता रोखण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र सुरू केली आहे.
आंतरजातीय विवाह अनुदान योजनेंतर्गत आंतरजातीय विवाह केल्यास त्या जोडप्याला 50,000 रुपयांचे प्रोत्साहन दिले जाईल तसेच बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातात. असे एकूण 3 लाख रुपयांची रक्कम आंतरजातीय विवाह योजना 2023 द्वारे विवाह 'Maharashtra Inter-Caste Marriage Scheme 2024' करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदत म्हणून दिली जाते.
मित्रांनो, जर तुम्हाला आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा तुमच्या परिसरात असे कोणी व्यक्ती असतील जे आंतर जातीय विवाह योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या. किंवा आमचा हा लेख त्यांना शेयर करा.
वाचकांना विनंती :- आम्ही आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात आंतरजातीय विवाह केलेले जे कोणी जोडपी असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा हि माहिती त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवू शकतील.
![]() |
| Maharashtra Inter-Caste Marriage Scheme 2024 |
महाराष्ट्र राज्यातील एखाद्या सामान्य प्रवर्गातील मुलाने किंवा मुलीने अनुसूचित जातीच्या मुला किंवा मुलीशी विवाह केल्यास, त्यांना या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून लाभ दिला जाईल.
केवळ महाराष्ट्रातील ज्या जोडप्यांनी हिंदू विवाह कायदा, 1955 किंवा विशेष विवाह कायदा, 1954 अंतर्गत आपले विवाह नोंदणीकृत केले आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
लाभार्थी जोडप्यांना देण्यात येणारा निधी केंद्र आणि राज्य सरकार "Maharashtra Inter-Caste Marriage Scheme 2024" अंतर्गत तयार करेल. ही रक्कम केंद्र आणि राज्य सरकार 50-50% देईल. या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल.
आंतरजातीय विवाह योजनेची वैशिष्ट
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
राज्य शासनाद्वारे आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच जाति भेदभाव नष्ट करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
आंतरजातीय विवाह अनुदान योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी त्या जोडप्यांना दिली जाईल ज्यांनी अनुसूचित जात व अनुसूचित जमाती च्या युवक व युवती सोबत लग्न केल असेल.
आंतरजातीय विवाह अनुदान अंतर्गत दिली जाणारी प्रोत्साहन राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
आंतरजातीय विवाह अनुदान योजनेचा लाभ आंतरजातीय विवाह करणाऱ्या सर्व जोडप्यांना घेता यावा यासाठी राज्य शासनाने वर्षीच्या उत्पन्नाची अट रद्द केली आहे.
बौध्द धर्मात धर्मांतर केलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्ती या योजनेखालील सवलती मिळण्यास पात्र आहेत.
आंतरजातीय विवाह अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदाराला समस्येचा सामना करावा लागू नये म्हणून अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे.
आंतरजातीय विवाह योजनेचा उद्देश
आपल्या देशात जातीच्या आधारावर खूप भेदभाव केला जातो हे तुम्हाला माहीत आहेच. मात्र हा भेदभाव कमी करण्यासाठी सरकार वेळोवेळी अनेक योजना करत असते. यातील एक योजना आंतरजातीय विवाह योजना आहे.
आंतरजातीय विवाह अनुदान योजनेंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना राज्य सरकारकडून 3 लाख रुपयांपर्यंतची प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. या महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना 2024 द्वारे देशातील आंतरजातीय विवाहाबाबतचा भेदभाव कमी करण्यासाठी.
आंतरजातीय विवाह अनुदान योजना समाजात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन तर देईलच पण पात्र जोडप्यांना प्रोत्साहनपर रक्कमही देईल.(Maharashtra Inter-Caste Marriage Scheme 2024)
आंतरजातीय विवाह योजनेसाठी पात्रता
अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत रक्कम प्राप्त करण्यासाठी, मुलगा आणि मुलगी यांचे वय अनुक्रमे 21 वर्षे आणि 18 वर्षांपेक्षा कमी नसावे.
आंतरजातीय विवाह अनुदान योजनाचा भाग होण्यासाठी विवाहित जोडप्यांपैकी एकाने अनुसूचित जाती किंवा जमातीचे असणे अनिवार्य आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येणारी प्रोत्साहनपर रक्कम मिळविण्यासाठी विवाहित जोडप्यांना कोर्ट मॅरेज करणे बंधनकारक आहे.
आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत, अनुसूचित जाती किंवा जमातीतील व्यक्तीने कोणत्याही मागासवर्गीय किंवा सामान्य श्रेणीतील मुलाशी किंवा मुलीशी विवाह केल्यास, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो.
आंतरजातीय विवाह योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवाशी दाखला
युवक व युवतीचा जातीचा दाखला
बँक खात्याचा तपशील
कोर्ट मॅरेज प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
पासपोर्ट आकाराचे फोटो
वधूचा व वराचा शाळा सोडल्याचा दाखला
लग्नाचा फोटो
विवाह नोंदणी दाखला
2 प्रतिष्ठित व्यक्तींचे शीफारस पत्र
जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला)
महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला
पॅन कार्ड झेरॉक्स
वधू व वराचा एकत्रित बँक खाते पासबुक झेरॉक्स
आंतरजातीय विवाह योजना चा फायदा
आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 3 लाखाची प्रोत्साहन राशी दिली जाते.
आंतरजातीय विवाह अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील जाती धर्मातील भेदभाव कमी होईल.
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन राशीचा उपयोग करून लाभार्थी स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करू शकेल.
आंतरजातीय विवाह अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल व त्यांचे जीवनमान सुधारेल. 'Maharashtra Inter-Caste Marriage Scheme 2024'
आंतरजातीय विवाह अनुदान योजनेच्या सहाय्याने राज्यातील नागरिक आतंरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहित होतील.
समाजात जाती धर्माबद्दल असलेला गैर समज नष्ट होण्यास मदत होईल व आपुलकी निर्माण होईल.
आंतरजातीय विवाह अनुदान योजना महाराष्ट्र सविस्तर माहिती
अ.क्र |
योजना |
सविस्तर माहिती |
|
1 |
योजनेचे
नाव |
आंतरजातीय
विवाहास प्रोत्साहन योजना |
|
2 |
योजनेचा
प्रकार |
राज्य |
|
3 |
योजनेचा
उद्देश |
अस्पृश्यता
निवारण करण्याचा एक भाग म्हणून आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक
योजना |
|
4 |
योजना
ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव |
लाभार्थी
हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा. लाभार्थी /विवाहीत जोडप्या पैकी एकजण हा
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास
प्रवर्गापैकी असावा.( जातीचा दाखला देणे आवश्यक) लाभार्थी /विवाहीत जोडप्या
विवाह नोंदणी /दाखला असावा. विवाहीत जोडप्याचे लग्न समयी वय वराचे 21 वर्षे
व वधूचे 18 वर्षे
पूर्ण असावे.( वर/वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले) दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे
शिफारस पत्रे वधु /वराचे एकत्रित फोटो. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त
जाती, भटक्या
जमाती व्यक्ती पैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवंर्ण हिदु लिंगायत, जैन, शिख
यांच्यातील असतील तर आतरंजातीय विवाह संबधोण्यात येतो व अनुसूचित जाती अनुसूचित
जमाती, विमुक्त
जाती, भटक्या
जमाती या मधील आंतर प्रवर्गातील विवाहास आंतरजातीय विवाहास संबोधण्यात येईल |
|
5 |
दिल्या
जाणाऱ्या लाभाचे स्वरुप |
आंतर जातीय विवाहास रु 50000/- पतीपत्नीच्या सयुक्त नांवाने धनाकर्ष. |
|
6 |
अर्ज
करण्याची पध्दत |
विहीत
नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडून घेऊन
विवाहीत जोडप्याने अर्जात नमूद कागदपत्राच्या मुळ व प्रमाणित प्रतीसह अर्ज
प्रत्यक्षात सादर करावा. |
|
7 |
योजनेची
वर्गवारी |
सामाजिक
सुधारणा |
|
8 |
संपर्क
कार्यालयाचे नांव |
संबधीत
जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/ मुंबई शहर व उपनगरसाठी समाज कल्याण
अधिकारी बृहमुंबई चेंबूर |
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
आंतरजातीय विवाह योजना आवश्यक अटी व शर्ती
आंतरजातीय विवाह अनुदान योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
आंतरजातीय विवाह अनुदान योजनेअंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्यांपैकी नवरा किंवा नवरी अनुसूचित जाती मधील असणे आवश्यक आहे.
आंतरजातीय विवाह अनुदान या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.
विवाह झाल्यानंतर ३ वर्षाच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
केवळ अशा जोडप्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल ज्यांचा विवाह हिंदू विवाह अधिनियम कायदा 1955 किंवा विशेष विवाह अधिनियम कायदा 1954 अंतर्गत झाला असेल.
अर्जदार व्यक्तीचे स्वतःच्या नावाने बँकेत खाते असणे आवश्यक आहे तसेच बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
आंतरजातीय विवाह अनुदान या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या जोडप्यामधील युवकाचे वय 21 व युवतीचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
आंतरजातीय विवाह अनुदान या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जोडप्यांना कोर्ट मॅरेज करणे आवश्यक आहे.
अर्जदार व्यक्तीने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थिती त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
आंतरजातीय विवाह योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी जोडप्याला सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर तुम्हाला होम पेजवर आंतरजातीय विवाह योजना दिसेल, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर एक नवीन पेज उघडेल.
यानंतर नवीन पेजवर फॉर्म असेल, फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा जसे कि मुलाचे पूर्ण नाव, मुलीचे पूर्ण नाव, जन्मतारीख, जात, लग्नाची तारीख, आधार क्रमांक इत्यादि आणि संबंधित लागणारी कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करून अर्ज सबमिट करा.
अशा प्रकारे तुमची आंतरजातीय विवाह योजनेत ऑनलाइन नोंदणी पूर्ण होईल.
आंतरजातीय विवाह योजना ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुंबई शहर व उपनगरांसाठी संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद/समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन या योजनेसाठी अर्ज करा.
फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा आणि संबंधित कागदपत्रांची झेरॉक्स अर्जासोबत जोडा आणि तो फॉर्म संबंधित कार्यालयात जमा करा अशा प्रकारे तुमची ऑफलाइन नोंदणी पूर्ण होईल.
अर्ज सबमिट केल्याची पावती संबंधित कार्यालयातून घ्यावी.अशा प्रकारे आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत तुमची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Inter-Caste Marriage Scheme 2024 form PDF download - Here
Inter-Caste Marriage Scheme 2024 GR download - Here
तर मित्रांनो, आजची ही आंतरजातीय विवाह अनुदान योजने संबंधीची अपडेट तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटच्या इतर पोस्ट सुद्धा नक्की पहा.
धन्यवाद..!!

0 Comments
नमस्कार मित्रांनो....!
सदर वेबसाईट ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित वेबसाईट नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली Comment मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकार्यांना भेट देण्यास विनंती करतो.
धन्यवाद........!