मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 ! जेष्ठ नागरिकांना मिळणार रु. 3000 | Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 In Marathi Mahiti

 Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 :- राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्याांना वयोमानपरत्वे येणाऱ्या  अपंगत्व, अशक्तपणा  यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वस्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” सुरु करण्यात आली आहे .

सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसांख्या 11.24 कोटी इतकी आहे. त्यापैकी सद्यस्थितीत 65 वर्षे व त्यावरील अंदाजित  एकूण 10-12 टक्के ज्येष्ठ नागरिक  (1.25 - 1.50 कोटी) आहेत. 

त्यापैकी मोठ्या प्रमाणात  ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपांगत्वाचा सामना करावा लागतो. सदर बाब विचारात घेवून केंद्र शासनाने दारीद्रय रेषेखालील 'Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 In Marathi' संबधित दिव्यांग /दुर्बलाताग्रस्त  ज्येष्ठ नागरीकांसाठी शारिरीक अक्षमतेनुसार सहाय्य साधने/उपकरणे पुरवण्याची वयोश्री योजना सुरु केली आहे. 

त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना  सक्रीय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता, संप्रेषण आणि  मोकळेपनाने जीवन जगता यावे, यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मनःस्वास्थ केंद्र,योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसीक तथा कौटुंबक स्वास्थ अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण  करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात “मुख्यमांत्री वयोश्री योजना”राज्यात राबरवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 In Marathi Mahiti
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 In Marathi Mahiti

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ध्येय व उद्धिष्ट

राज्यातील ६5 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जिवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि  त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्यातपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वस्थ "Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 In Marathi" अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षनाकरीता एकवेळ एकरकमी रु. 3000/- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण  (D.B.T.) प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे स्वरूप 

सदर योजने अंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता /+ दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने/उपकरणे खरेदी करता येतील.

उदा:- चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॅाड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वाॅल्कर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट,सर्वाईकल कॉलर इ.   

तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र/ प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल. 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेची पात्रता 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्य शासनाकडून काही निकष ठरविण्यात आलेले आहेत, यामधील काही महत्त्वपूर्ण निकष किंवा अटी शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत, त्या तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता.

लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरनाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड अथवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजनेअंतर्गत अथवा राज्य/केंद्रशासित सरकारच्या इतर  पेन्शन योजनेअंतर्ग वृद्धापकाळ निवृतीवेतन  मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो.

लाभार्थी व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणून 65 वर्षे पूर्ण केलेली असावीत.

लाभार्थी व्यक्तींकडे आधार कार्ड किंवा आधार कार्डसाठी केलेला अर्ज, नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे.

लाभार्थी अर्जदारांची एकूण वार्षिक उत्पन्न मर्यादा 2 लाख रुपयांच्या आत असावी, याबाबत लाभार्थ्यांनी स्वयघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.

सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 In Marathi स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर सरकारी नियंत्रण सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्त्रोताकडून विनामूल्य उपकरण प्राप्त केलेले नसावे.

पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या रु. 3,000 रकमेची उपकरण खरेदी केल्यासंदर्भातील व प्रशिक्षण घेतल्या संदर्भातील प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. 

निवड/निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थी संख्यांपैकी 30 टक्के महिला असतील.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेची कागदपत्रे :-

आधारकार्ड/मतदान कार्ड

राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स

पासपोर्ट आकाराचे 2 फोटो

मोबाईल क्रमांक

अपंग असल्यास प्रमाणपत्र

स्वयं-घोषणापत्र

शासनाने ओळखपत्र पाठविण्यासाठी विहित केलेली अन्य आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजनेची ठळक वैशिष्ट्ये

पात्र ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रकट होणाऱ्या अपंगत्व/अशक्तपणाच्या मर्यादेनुसार उपकरणांचे मोफत वितरण.

एकाच व्यक्तीमध्ये अनेक अपंगत्व/अशक्तता दिसून आल्यास, प्रत्येक अपंगत्व/अशक्तपणाच्या संदर्भात सहाय्यक उपकरणे दिली जातील.

आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (ALIMCO) मदत आणि सहाय्यक जिवंत उपकरणांची एक वर्ष मोफत देखभाल करेल.

उपायुक्त/जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांची ओळख राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे केली जाईल.

शक्यतो, प्रत्येक जिल्ह्यातील 30% लाभार्थी महिला असतील.

राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन/जिल्हास्तरीय समिती NSAP किंवा राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या बीपीएल लाभार्थींचा डेटा बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखीसाठी वापरू शकते.

उपकरणे कॅम्प मोडमध्ये वितरित केली जातील.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी Online अर्ज कसा करावा

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्यातील शिंदे सरकारमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली. 

याबद्दलचा महत्वपूर्ण असा मंत्रिमंडळ निर्णय 5 फेब्रुवारी रोजी घेण्यात आला व त्यासंदर्भातील शासन निर्णय 6 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. 

परंतु अद्याप मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन नोंदणी अर्ज प्रक्रिया किंवा रजिस्ट्रेशन यासंदर्भातील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

शासन निर्णयानुसार राष्ट्रीय योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे.

अद्याप मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन सुरु झालेली नसल्यामुळे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख (last date) शासनाकडून देण्यात आलेली नाही. 

ऑनलाईन अर्ज किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाल्यानंतर आमच्या वेबसाईटवर यांबद्दलची माहिती अद्यावत करण्यात येईल.

तर मित्रांनो, आजची ही  मुख्यमंत्री वयोश्री योजने संबंधीची अपडेट तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटच्या इतर पोस्ट सुद्धा नक्की पहा.

धन्यवाद..!!

Post a Comment

0 Comments