E- Ration Card Apply Online in Marathi Mahiti :- नमस्कार मित्रांनो, सदर लेखात आपण रेशन कार्ड विषयी काही महत्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत.
देशातील गरिबांना मोफत अन्न देण्यासाठी रेशन कार्डचा वापर केला जातो. रेशनकार्ड हे केवळ अन्नासाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणूनही महत्त्वाचे दस्तऐवज आहे.
तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही घरबसल्या सहज अर्ज करू शकता. शिधापत्रिका काढण्यासाठी तुम्हाला वारंवार सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. यासोबतच तुम्ही घरबसल्या तुमच्या शिधापत्रिकेची स्थितीही तपासू शकता.
याशिवाय, तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्याचे नाव रेशनकार्डमध्ये समाविष्ट नसल्यास ते देखील समाविष्ट करू शकता. तुम्ही राज्य सरकारच्या वेबसाइटवरूनही ई-रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.
रेशनकार्ड काय आहे आणि ते कशासाठी वापरले जाते इत्यादी गोष्टी तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकल्या असतील. सोप्या भाषेत सांगायचे तर, हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, ज्याचा वापर करून भारतातील सामान्य नागरिक दुकाने किंवा रेशन डेपोमधून 'E- Ration Card Apply Online in Marathi Mahiti' वाजवी किमतीत वस्तू खरेदी करू शकतात.
हे सार्वजनिक निधी प्रणालीनुसार राज्य सरकार आपल्या नागरिकांना जारी करते. याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग उशीर कशासाठी, चला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया रेशन कार्ड म्हणजे काय आणि ते इतके महत्त्वाचे का आहे.
![]() |
| E- Ration Card Apply Online in Marathi Mahiti |
रेशन कार्ड हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. राज्य सरकारने दिलेले हे कार्ड अनुदानावर धान्य घेण्यासाठी आणि इतर अनेक कामांसाठी महत्त्वाचे आहे.
सरकारी दस्तऐवज म्हणून ते सहज स्वीकारले जाते. वेगवेगळ्या "E- Ration Card Apply Online in Marathi" श्रेणीतील लोकांना रेशनकार्डे दिली जातात.
रेशन कार्डधारकांना त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार BPL, APL, AAY आणि AY कार्ड दिले जातात.
शिधापत्रिका पात्रता आणि निकष
केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या काढून तीन शिधापत्रिका योजना ( तिहेरी शिधापत्रिका योजना ) राबविल्या जातात.
पिवळ्या रेशन कार्डसाठी निकष
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थ्यांना ( बी.पी.एल. ) पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डसाठी निकष खालील प्रमाणे आहेत.
दारिद्र्य रेषेच्या २००२ च्या सर्वे यादीत असणे आवश्यक आहे, तसे प्रमाणपत्र तुमच्याकडे असावे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५००० रु पेक्षा जास्त नसावे.
कुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर, वकील किंवा शासकीय नोकरीत नसावी.
कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी.
कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे.
कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या नावे एकूण दोन हेक्टर जिरायत किंवा बागायत जमिनीच्या जास्त नसावी.
केशरी रेशन कार्डसाठी निकष :-
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थ्यांना ( ए.पी.एल. ) केशरी रंगाच्या शिधापत्रिकेसाठी निकष खालील प्रमाणे आहेत.
कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. १५००० हजारा पेक्षा जास्त परंतु १ लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त नसावे.
कुटुंबातील कोणाही व्यक्तीकडे चार चाकी वाहन नसावे.
कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या नावे मिळून ४ हेक्टर बागायती किंवा त्यापेक्षा जास्त जमीन नसावी.
प्राधान्य गटातील रेशन कार्डसाठी निकष
शहरी भागात ज्या लाभार्थ्यांनी सन २०११ मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कोटुंबीक उत्पन्न नमूद केले आहे त्या उत्पन्ना नुसार शहरी भागात कमाल रु. ५९००० पर्यंत वार्षिक कोटुंबीक उत्पन्न असणारे लाभार्थी पात्र समजले जातील.
ग्रामीण भागात रु. ४४००० हजार वार्षिक कोटुंबीक E- Ration Card Apply Online in Marathi उत्पन्न असणारे लाभार्थी पात्र समजले जातील. सदर लाभार्थ्यांच्या केशरी शिदापात्रीकेवर उजव्या कोपर्यात प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी असा शिक्का मारला जातो.
अंत्योदय रेशन कार्ड लाभार्थी निकष
केंद्र शासनाने दि. २५/१२/२००० रोजी अंत्योदय योजनेची सुरुवात करण्यात आली.सदर योजने अंतर्गत गरीबातील गरीब कुटुंबाना ३५ किलो धान्य गहू- २ रु. व तांदूळ-३ रु. प्रती किलो या दराने वितरीत करण्यात येते.
ज्या कुटुंबातील प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा अपंग किंवा ६० वर्ष वयावरील वृद्ध आहेत आणि ज्यांना उदरनिर्वाहाचे निचित सदन नाही, ज्यांना सामाजिक आधार नाही असे लाभार्थी.
एकटे राहत असलेले दुर्धर आजारग्रस्त / अपंग/विधवा/६० वर्षावरील वृद्ध, ज्यांना कोटुंबीक व सामाजिक आधार अथवा कायम स्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही .
आदिम आदिवासी कुटुंबे ( माडिया,कोलम,कातकरी ).
भूमिहीन शेतमजूर, अल्प भूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर उदा. कुंभार,चांभार,मोची,विणकर,सुतार,लोहारतसेच झोपड पट्टीतल रहिवाशी विशिष्ठ क्षेत्रात रोजदारीवर काम करून उपजीविका करणारे नागरिक जसे हमाल, मालवाहक, सायकल रिक्षा चालविणारे, हातगाडी वरून मालाची ने-आण करणारे,फळ व फुले विक्रेते,गारुडी,कचर्यातील वस्तू गुल करणारे तसेच निराधार व अशा प्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तीची कुटुंबे.
कुष्टरोगी/ बरा झालेला कुष्ठरोगी कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे.
शुभ्र शिधा ( पांढरे रेशन कार्ड ) पत्रिकासाठी निकष
ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून वार्षिक उत्पन्न रु १ लक्ष किंवा त्या पेक्षा जास्त असेल किंवा त्या कुटुंबातील कोणाही व्यक्ती कडे चार हेक्टर पेक्षा जास्त बारमाही बागायती शेत जमीन असेल अशा कुटुंबाना शुभ्र शिधापत्रिका देण्यात येते.
रेशन कार्ड साठी लागणारे कागदपत्रे
राहत्या घराची वीज बिलाची छायांकित प्रत
रहिवासी बाबतचा पुरावा
स्वतःच्या घराचा उतारा किंवा कर पावती
उत्पन्नाचा दाखला
आधार कार्ड चे झेरॉक्स
मतदान कार्ड झेरॉक्स
राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेले पासबुक
गॅस एजन्सीचा दाखला जर गॅस असेल
फोटो
रेशन कार्ड (Ration Card ) आपल्या भारतामधील अति महत्वाचे एक सरकारी कागदपत्रक आहे, त्याचे अनेक फायदे असतात.
आम्ही अपेक्षा करतो कि रेशन कार्ड काय आहे आणि त्याचे महत्व, आणि ते कसे काढावे, हि माहिती समजली असेल.
ई-शिधापत्रिकेसाठी Online अर्ज कसा करावा
नवीन रेशन कार्ड च्या Online Process साठी शासनाने वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे, या वेबसाईट द्वारे तुम्ही नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करू शकतात. त्याच बरोबर रेशन कार्ड मध्ये नवीन नाव add करण्यासाठी नाव दुरुस्त करण्यासाठी आणि इतर दुरुस्तीसाठी देखील Online अर्ज करू शकता. अधिकृत वेबसाईट https://rcms.mahafood.gov.in/ ला भेट द्या.
Public Login हा पर्याय निवडल्यावर तुमच्यासमोर दुसरे Page Open होईल.
दुसरे Page Open झाल्यानंतर New User! Sign Up Here या बटनावर Click करावे.
![]() |
| E- Ration Card Apply Online in Marathi Mahiti |
New User! Sign Up Here झाल्यानंतर तुमच्यासमोर दुसरे Page Open होईल.
दुसरे Page Open झाल्यानंतर I Want To Apply For New Ration Card या पर्यायावर Click करावे.
I Want To Apply For New Ration Card या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल त्या फ्रॉम मध्ये Name, Login Id, Full Name (As Per Aadhar), Enter Password, Aadhar Number, Comform Password, Gender, Mobile Number, E-mail Address व Captcha Coad टाकून Gte OTP या पर्यायावर Click करावे.
Gte OTP या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल क्रमांक Link असेल त्या मोबाईल क्रमांकावर एक 6 अंकी Code येईल तो Code OTP या पर्याया मध्ये टाकून Submit या पर्यायावर Click करावे.
Submit या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्या समोर नवीन Page वर Congratulation ! You Have Successfully Registered With Login Id : xxxxxx असा Massage येईल आणि त्याखाली Click Here To Login असा पर्याय येईल त्या पर्यायावर Click करावे. जर तुमचे Account Open झाले नही तर तुमचे Already Retion Card आहे.
Click Here To Login या पर्यायावर Click केल्यानंतर तुम्ही पुन्हा Self Service For Ration Card या Page वर याल, या Page वर आल्यानंतर तुम्हाला Registered User पर्यायावर Click करावे लागेल.
Registered User पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्यासमोर तीन पर्याय येतील त्यातील आधार कार्ड हा पर्याय निवडावा आणि Captcha Coad टाकून Gte OTP या पर्यायावर Click करावे.
Gte OTP या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल क्रमांक Link असेल त्या मोबाईल क्रमांकावर एक 6 अंकी Code येईल तो Code OTP या पर्याया मध्ये टाकून Submit या पर्यायावर Click करावे.
Submit या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्या समोर Ration Card Manegment System (RCMS) हे Page Open होईल. हे Page Open झाल्यानंतर Application Request या पर्यायावर तुम्हाला Click करावे लागेल.
Application Request या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्या समोर District Of Applicant, Tehsil Of Applicant आणि Village Of Applicant याची सर्व माहिती योग्यरीत्या बरोबर भरावी लागेल.
![]() |
| E- Ration Card Apply Online in Marathi Mahiti |
District Of Applicant, Tehsil Of Applicant आणि Village Of Applicant याची सर्व माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर तुम्हाला Ration Card And Member Personal Details यांची माहिती भरावी लागेल. माहितीमध्ये सर्वात प्रथम Passport Size Upload करणे महत्त्वाचे आहे.
सर्वात प्रथम तुम्हाला तुम्हाच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीची माहिती योग्यरीत्या भरावयाची आहे.
कुटुंबातील प्रमुख व्यक्तीची माहिती भरतांना ज्याठिकाणी Red Star असेल तीच माहिती भरणे आवश्यक आहे बाकी माहिती नाही भरली तरी चालेल.
कुटुंबातील प्रमुख व्यक्तीची माहिती भरून झाल्यानंतर Remark लिहावा आणि Terms And Conditions या पर्यायावर Click करून Save या बटनावर तुम्हाला Click करावे लागेल.
कुटुंबातील प्रमुख व्यक्तीची माहिती भरून झाल्यानंतर कुटुंबातील बाकी व्यक्तींची माहिती सुद्धा अश्या प्रकारे Add करावी लागेल.
![]() |
| E- Ration Card Apply Online in Marathi Mahiti |
कुटुंबातील सर्व व्यक्तींचे नाव ADD झाल्यानंतर तुम्हाला इतर सर्व माहिती योग्यरीत्या भरावी लागणार आहे आणि त्याचबरोबर योग्य ते कागदपत्रे सुद्धा UPLOD करावी लागणार आहे.
त्यानंतर तुम्हाला Submit Ration Card For Verifacation And Approvel या पर्यायावर तुम्हाला Click करावे लागेल.
यानंतर तुमचे Ration Card Submite होईन आणि तहसील कार्यालयात Approvel ला जाईल आणि काही दिवसातच तुम्हाला तुमचे ई- रेशनकार्ड Mobile वर पाहायला मिळेल.
तर मित्रांनो, आजची ही ई- शिधापत्रिका संबंधीची अपडेट तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटच्या इतर पोस्ट सुद्धा नक्की पहा.
धन्यवाद..!!










0 Comments
नमस्कार मित्रांनो....!
सदर वेबसाईट ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित वेबसाईट नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली Comment मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकार्यांना भेट देण्यास विनंती करतो.
धन्यवाद........!