प्रत्येक आई वडिलांना त्यांच्या मुलांची अत्यंत काळजी असते मुलांच्या संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी पालकांवरच असते, मुलांना चांगले उत्तम शिक्षण मिळावे, त्यांनी भविष्यात मोठी प्रगती करावी यासाठी सर्व पालक त्यांच्या कुवतीप्रमाणे प्रयत्न करीत असतात.
![]() |
| Sukanya Samriddhi Yojana 2015 In Marathi Mahiti |
पालकांना जशी मुलांच्या शिक्षणाची काळजी असते तशीच काळजी मुलांच्या 'Sukanya Samriddhi Yojana 2015 In Marathi' लग्नाची सुद्धा असते कारण लग्नांमध्ये मोठ्याप्रमाणात खर्च होतो, गरीब पालकांना त्यांच्या मुलांचे पालनपोषण त्यांच्या कमकुवत आर्थिक परस्थितीमुळे योग्यरीतीने करता येत नाही तसेच त्यांना त्यांच्या मुला मुलींचे पालनपोषण करतांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
देशातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना तिच्या चांगल्या शिक्षणसाठी तसेच तिला तिच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनविण्यासाठी आणि नंतर मुलगी सज्ञान झाल्यावर तिला तिच्या लग्नासाठी हक्काचे पैसे मिळावे या संपूर्ण उद्देशाने केंद्र शासनाने सन 2015 पासून सुकन्या समृद्धी योजना योजनेची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरु केली आहे.
वाचक मित्रहो, या लेखात आपण सुकन्या समृद्धी योजना "Sukanya Samriddhi Yojana 2015 In Marathi" संबंधित संपूर्ण महत्वपूर्ण माहिती जसेकी या योजनेचे लाभ, योजनेला लागणारी आवश्यक कागदपत्रे, या योजनेचा उद्देश काय आहे, तसेच अर्जा संबंधित माहिती इत्यादी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
सुकन्या समृद्धी योजना संकल्पना आणि उद्देश
सुकन्या समृद्धी योजना(SSY) ही केंद्र सरकारची एक लहान ठेव योजना आहे. जी फक्त मुलींसाठी चालू केली आहे.
“बेटी बचाव बेटी पढाओ” या अभियानांतर्गत माननीय पंतप्रधानांनी दिनांक २२ जानेवारी २०१५ रोजी चालू केली. मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवण्याच्या उद्देश या योजनेचा आहे.
केंद्र सरकारने या योजनेचे दिनांक १४ डिसेंबर २०१४ रोजी अधिकृत सूचना दिली होती. ही योजना मुलीच्या भावी शिक्षणासाठी आणि लग्नाचा खर्चासाठी निधी तयार करण्यास तिच्या पालकांना प्रोत्साहित करते.
सुकन्या समृद्धी योजना (SSY) साठी मुलीचे पालक जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि काही खाजगी बँका मध्ये जाऊन Sukanya Samriddhi Yojana 2015 In Marathi काही आवश्यक कागदपत्रांसह मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात.
सुकन्या समृद्धी योजना (SSY) साठी खाते उघडण्यासाठी मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असावे.
एका मुलींसाठी एकच खाते मंजूर आहे. एक कुटुंब फक्त दोनच सुकन्या समृद्धी योजनेचे खाते चालू करू शकतात.
सुकन्या समृद्धी योजना (SSY) साठी कमीत-कमी २५० रुपये आणि जास्तीत-जास्त १ लाख ५० हजार रुपये प्रतिवर्षं भरण्याची मुभा आहे.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे
कमीत-कमी २५० रुपये भरून खाते उघडता येते.
वर्षाला किमान २५० रुपये आणि कमाल १ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करता येते.
या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी २१ वर्षे आहेत.
सध्या , सुकन्या समृद्धी योजनेचे (SSY) अनेक कर (Tax) लाभ आहेत.
लघु बचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याजदर याचे आहे. (७.६% इतके)
जमा केलेली मुद्दल, संपूर्ण कालावधीत मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटी लाभ कलम 80C अंतर्गत करमुक्त आहेत.
सुकन्या समृद्धी खाते भारतामध्ये एका पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये ट्रान्सफर करता येते.
मॅच्युरिटी नंतर खाते बंद न केल्यास मुदतीनंतरही जमा रकमेवर व्याज मिळत राहते.
मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची परवानगी आहे.
खाते चालू केल्यानंतर फक्त पंधरा वर्षापर्यंत पैसे भरायचे असतात.
सुकन्या समृद्धी योजना कागदपत्रे
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
सुकन्या समृद्धी योजना (प्रपत्र ) फॉर्म (फॉर्म pdf पहा)
मुलीचा जन्म दाखला
पॅनकार्ड
आधारकार्ड
मतदार ओळखपत्र
रेशनकार्ड, वीजबिल
वरील कागदपत्रे पालकांची असावीत. पालक म्हणजे आईवडील किंवा कायदेशीररित्या मुलीचा सांभाळ करत असलेली व्यक्ती.
सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये :-
सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडण्यापासून २१ वर्ष एवढा आहे.
कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते.
सुकन्या समृद्धी योजनेचा अवधी २१ वर्ष असला तरीही मात्र खाते उघडल्यापासुन १४ वर्षांपर्यंत पैसे भरायाचे आहेत.
मुलीचे लग्न वय २१ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी झाले तर सुकन्या समृद्धी योजना खाते आपोआप बंद होते.
मुलीच्या वयाची २१ वर्ष पूर्ण झाल्या नंतर खाते बंद न केल्यास शिल्लक एकूण रकमेवर बँक किंवा पोस्ट खात्याच्या चालू व्याजदरात व्याज मिळत राहते.
मुलीने १८ वर्ष पूर्ण केल्यास, मुलीच्या उच्च शिक्षणासाठी मागील आर्थिक वर्षाच्या शिल्लक रक्कमेवर ५०% रक्कम अकाली काढता येऊ शकते. Sukanya Samriddhi Yojana 2015 In Marathi Mahiti
दरवर्षी किमान रुपये २५०/- सुकन्या समृद्धी खात्यात जमा करावे लागतात .रक्कम जमा नाही केले तर खाते बंद होते. मात्र, खाते पुन्हा सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी ५०/- रुपये दंड भरुन खाते पुन्हा सुरू करता येते.
खाते धारकाचा मृत्यू झाल्यास पालकांना व्याजासाहित जमा रक्कम मिळते.
भारत सरकारची १०० % सुरक्षित गुंतवणूक योजना आहे.
हे खाते भारतामध्ये एका पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये ट्रान्सफर करता येते.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करावा :-
सुकन्या समृद्धी योजना खाते हे कोणत्याही बँक अथवा पोस्ट ऑफिस शाखे मध्ये उघडले जाऊ शकते त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींचा अवलंब करावा –
तुम्हाला ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे आहे त्या ठिकाणी जावे. त्याठिकाणी सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म घ्यावा आणि आवश्यक माहिती भरून सोबत आवश्यक
कागदपत्रांची झेरॉक्स जोडून फॉम त्या बँकेत अथवा पोस्टात भरावा.
तुम्हाला दरमहा जेवडी रक्कम भरावयाची आहे ती तुम्ही फॉर्म मध्ये आणि स्लिप वर लिहा.
तुमचा फॉर्म आणि पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला त्याची पावती दिली जाईल व तुमच्या मुलीच्या नावे खाते चालू केले जाईल.
तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिस मधून (ज्या ठिकाणी खाते खोलले आहे )एक पासबुक दिले जाईल.
तर मंडळी, आजची ही सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samruddhi Yojana संबंधीची अपडेट तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटच्या इतर पोस्ट सुद्धा नक्की पहा.
धन्यवाद..!!
.png)
0 Comments
नमस्कार मित्रांनो....!
सदर वेबसाईट ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित वेबसाईट नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली Comment मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकार्यांना भेट देण्यास विनंती करतो.
धन्यवाद........!