राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी "लेक लाडकी" योजना 2024 सुरु | कागदपत्रे,अटी,शर्ती,पात्रता ! Lek Ladaki Yojna 2024 Maharashtra In Marathi Mahiti

Lek Ladaki Yojna 2024 Maharashtra :- राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु करण्यात आली आहे .

पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुांबात मुलींच्या जन्मानांतर टप्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानांतर तीला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील अशी घोषणा करण्यात आलेली आहे. 

त्यास अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” ही योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

माझी कन्या भाग्यश्री (सुधारित ) ही योजना अधिक्रमीत करून 'Lek Ladaki Yojna 2024 Maharashtra' राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानांतर तिच्या  सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” योजना सुरू करण्यास या शासन निर्याणयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

Lek Ladaki Yojna 2024 Maharashtra In Marathi Mahiti
Lek Ladaki Yojna 2024 Maharashtra In Marathi Mahiti 

लेक लाडकी योजनेची उद्धिष्टे

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे.

मुलींच्या शिक्षणास चालणा देणे.

मुलींचा मृत्युदर कमी करणे व बालविवाह रोखणे.

कुपोषण कमी करणे.

शाळाबाह्य मुलींचे प्रमाण (0) शून्य वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे. 

लेक लाडकी योजनेच्या अटी व शर्ती 

"लेक लाडकी" ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबामध्ये  दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानांतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना "Lek Ladaki Yojna 2024 Maharashtra" लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.

पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सादर करतेवेळी माता/पित्याने  कुटुंब  नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा  लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानांतर माता / पित्याने  कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील. 

दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व Lek Ladaki Yojna 2024 Maharashtra त्यानांतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र ) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील. 

लाभार्थीचे कुटूंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील. 

लाभार्थीचे  बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.

लाभार्थीचे कुटूंबाचे वार्षीक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे. 

आवश्यक कागदपत्रे

लाभार्तींचा जन्माचा दाखला

कुटुंब प्रमुखाांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी याांचा दाखला आवश्यक राहील.

लाभार्तींचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील) 

पालकाचे आधार कार्ड

बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत ) 

मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला) 

संबधित टप्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)

कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया प्रमाणपत्र (“अ” येथील अटी शार्तीमधील क्रमांक 2 येथील अटीनुसार) 

अंतिम लाभाकरिता मुलीच विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, (अविवाहित असल्याबाबत लाभार्तींचे स्वयं घोषणापत्र).

लेक लाडकी योजनेचा लाभ कसा घ्यावा

सदर योजनेतंर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी वा तदनांतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबधित स्थानिक स्वराज्य  संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबाताच्या  परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्त्यायक त्या कागदपत्राांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.

सदर परिशिष्टामध्ये आवश्यकतेनुसार काही सुधारणा करणे गरजेचे असल्यास त्याबाबत आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी त्यांचे स्तरावरून सुधारणा कराव्यात. 

सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज, राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपयुक्त महिला व बाल विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील.

अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यावा. गरजेप्रमाणे लाभार्थ्यांस अर्ज भरण्यास मदत करावी आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यव्यक्षिका / मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा . 

अंगणवाडी पर्यव्यक्षिका / मुख्यसेविका यांनी, सदर अर्जाची व प्रमाणपत्राांची छाननी/तपासणी करुन प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थामधील मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एकित्रत यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांना तर मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्राच्या बाबतीत नोडल अधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करावी. 

जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद/ नोडल अधिकारी यांनी योग्य ती छाननी करुन यादीस मान्यता देवून आयुक्तालयास सादर करावी. 

अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अर्द सादर करताांना महिला व बाल विकास विभागाच्या सक्षम प्राधिका-यांकडून देण्यात आलेले अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद हे याच्छिक  (Random) पध्दतीने जास्त सांख्येने अर्ज प्राप्त झालेल्या क्षेत्राची तपासणी करतील व त्याांची खात्री झाल्यानांतर लाभार्थी यादीला मान्यता देतील. 

पर्यव्यक्षिका / बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्याांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून एखादा अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह सादर केलेला नसल्यास असा अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत पूर्णता करण्याकरता अर्जदारास लेखी कळवावे. त्याप्रमाणे अर्जदाराने 1 महिन्यात कागदपत्रांच्या पूर्णतेसह दाखल करावा. 

काही अपरिहार्य कारणास्तव अर्जदार या मुदतीत अर्द दाखल करू शकला नाही तर वाढीव 10 दिवसांची मुदत देण्यात यावी. अशा प्रकारे कमाल 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सदरच्या अर्जावर कार्यवाही पूर्ण. 

लेक लाडकी या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्यात प्राप्त झालेले अर्ज यापैकी अपूर्ण  व निकाली काढलेल्या अर्जांचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या 5 तारखे पर्यंत कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद / नोडल अधिकारी यांनी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य, याांच्या कार्यालयाकडे सादर करावी. 

सदर शासन निर्णय मां. मंत्रीमंडळाने दिनांक 10.10.2023 रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. 

लेक लाडकी योजनेचे फायदे

लेक लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींना शिक्षणाची सुवर्णसंधी मिळणार आहे.

चांगले शिक्षण मिळाल्याने गरीब मुलींनाही रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहेत.

लेक लाडकी या योजनेंतर्गत गरीब कुटुंबात मुलीच्या जन्मावर ₹ 5000 दिले जातील.

जेव्हा मुलगी पहिली वर्गात प्रवेश घेते तेव्हा तिला ₹ 6000 ची रक्कम दिली जाईल.

जेव्हा मुलगी सहाव्या वर्गात प्रवेश घेते तेव्हा तिला 7000 रुपये मिळतील.

जेव्हा मुलगी 11वी मध्ये प्रवेश घेते तेव्हा तिला ₹ 8000 दिले जातील.

शेवटी, जेव्हा लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे होईल, तेव्हा तिला पुढील अभ्यासासाठी ₹ 75000 ची एकरकमी रोख रक्कम दिली जाईल.

लेक लाडकी योजनेचा अर्ज

https://drive.google.com/file/d/1HkollIFG72ceJgFm0AtRc0K2iLmnv7up/view


तर मित्रांनो, आजची ही  लेक लाडकी या योजने  संबंधीची अपडेट तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटच्या इतर पोस्ट सुद्धा नक्की पहा.

धन्यवाद..!!

Post a Comment

0 Comments