Post Office 520rs. insurance Scheme 2024 :- भारतीय डाक विभागाची इंडिअन पोस्ट पेमेंट बँक मार्फत "टाटा एआयजी" ची अपघाती विमा पॉलिसी. 

"टाटा एआयजी" इन्शुरन्स आणि  इंडिअन पोस्ट पेमेंट बँक यांच्यामध्ये करार 'Post Office 520rs. insurance Scheme 2024' झालेला आहे आणि यामध्ये 10 लाखांचा अपघाती विमा फक्त तुम्हाला 520/- रुपयांमध्ये मिळणार आहे. 

इंडिअन पोस्ट पेमेंट बँक मार्फत "टाटा एआयजी" ची अपघाती विमा पॉलिसी मध्ये कोण अर्ज करू शकतो, वयोमर्यादा किती आहे, योजनेचा तपशील काय आहे याची माहिती आपण सविस्तर या लेखात बघणार आहोत.  

Post Office 520rs. insurance Scheme 2024 In Marathi Mahiti
Post Office 520rs. insurance Scheme 2024 In Marathi Mahiti

विमा पॉलिसी योजनेचा तपशील खालीलप्रमाणे

अपघाती मृत्यू :- रु. 10 लाख 

कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व :- रु. 10 लाख 

कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व :- रु. 10 लाख 

अपघातामुळे अवयव गमावला :- रु. 10 लाख 

अपघाती वैद्यकीय खर्च :- रु. 1 लाख पर्यंत ( हॉस्पिटल मध्ये 24 तास दाखल होणे आवश्यक )

इवॅक्युएशन लाभ :- रु. 5000 पर्यंत 

शैक्षणिक लाभ :- रु.1 लाख पर्यंत ( कमाल 2 मुलांसाठी )

इन हॉस्पिटल रोज रोख :- 10 दिवसांसाठी रु.1000 ( 2 दिवसांची कपात करून फक्त अपघातासाठी )

कुटुंबाच्या वाहतुकीचा लाभ :- रु. 25000 पर्यंत 

शिल्लक राहिलेल्यांच प्रत्यावर्तन :- रु. 5000 पर्यंत 

अंतिम विधीचा लाभ :- रु. 5000 पर्यंत

कोमा :- रु.1 लाख ( एकवेळचा लाभ )

आतंकवाद :- विमा संरक्षण 

टेलीकन्सल्टेशन  सामान्य (अमर्यादित ) :- "टाटा एआयजी" अप्लिकेशनद्वारे 

विमा पॉलिसीसाठी वयोमर्यादा

भारतीय डाक विभागाची इंडिअन पोस्ट पेमेंट बँक मार्फत "टाटा एआयजी" ची अपघाती विमा पॉलिसी साठी वय वर्ष 18 ते वय वर्ष 65 पर्यंत ची व्यक्ती अर्ज करू शकतो.

विमा पॉलिसीसाठी कागदपत्रे

भारतीय डाक विभागाची इंडिअन पोस्ट पेमेंट बँक  Post Office 520rs. insurance Scheme 2024 मार्फत "टाटा एआयजी" ची अपघाती विमा पॉलिसी साठी आधार कार्ड ,पॅन कार्ड आणि व्यक्ती स्वतः इतकेच कागदपत्रे लागणार आहेत.

विमा पॉलिसीसाठी अर्ज कसा करायचा

भारतीय डाक विभागाची इंडिअन पोस्ट पेमेंट बँक मार्फत "टाटा एआयजी" ची अपघाती विमा पॉलिसी साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या इंडिअन पोस्ट पेमेंट बँक किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.

अपघाती विमा पॉलिसी Online अर्ज पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन भरू शकता. 

Online अर्ज  केल्यानंतर तुम्हाला पोच पावती तुमच्या इ-मेल वर मिळते आणि त्याचबरोबर एक Halpline Number सुद्धा मिळतो. 

तुम्हाला Halpline Number वर कॉल करावा लागेल त्यानंतरच या पॉलिसीची  प्रोसेस सुरु होते. 

अशाप्रकारे भारतीय डाक विभागाची इंडिअन पोस्ट पेमेंट बँक मार्फत "टाटा एआयजी" ची अपघाती विमा पॉलिसी ची योजना आहे.

तर मित्रांनो, आजची ही भारतीय डाक विभागाची अपघाती विमा पॉलिसी संबंधीची अपडेट तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटच्या इतर पोस्ट सुद्धा नक्की पहा.

धन्यवाद..!!